
प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

यवतमाळ- जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन व विकास समिती वाढीस यावी म्हणून व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने जिल्हा कार्यकारणी कडून पर्यावरण क्षेत्रात व सामाजिक कार्यात आवड असलेल्या व करत असलेल्या कार्यात अधिक भर पडावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील तालुका मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव, कळंब व यवतमाळ शहरातील पर्यावरणाची आवड असलेल्या पत्रकार व ननागरिक अनेक सदस्यांना संस्थापक अध्यक्ष मा. डि.के. आरिकर (दलितमित्र व आदिवासी सेवक) यांच्या हस्ते व यवतमाळ जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल, जिल्हासचिव प्रकाश खुडसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटक कैलास कोडापे यांच्या सहकार्याने आणि अजय मांडवकर,अरविंद कोडापे, सुविधाताई बाबोडे, प्रणालीताई येरपुडे, मनोहर बोभाटे यांच्या उपस्थितीत मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील समाज कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींना पदभार देण्यात आला यामध्ये कविताताई धुर्वे, विशाल मासुरकर, सोमेश्वर गेडेकर, संदीप कारेकार, मयूर मरसकोल्हे, प्रवीण गलाट, तुषार देवतळे, योगेश धोंडे, विरेंद्र चव्हाण, गजानन सुरकर, महेश मेश्राम, मंगेश ठाकरे, पवन जाधव, नरेश राऊत, सुहास मुडे, राकेश मडावी, कृष्णा कोटरंगे, मनोज जुमनाके इत्यादी अनेक सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन पदभार देण्यात आले.
त्याच बरोबर प्रत्येक तालुक्यातील कार्यकारणी सदस्यांना सोबतीने तालुक्याला लागून असलेल्या नदीपात्रातून वाळू माफिया कडून मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उपसा होऊन नदीपात्राचे व निसगाँचे मोठे नुकसान होत आहे हे थांबवण्यासाठी रेती तस्करी करणाऱ्या लोकांवर प्रशासना मार्भात निबंध आणण्याचा प्रयत्न करणे, तालुक्यातील प्रत्येक गावात – शहरातील तसेच शाळेच्या मैदानात, मोक्षधम मध्ये, पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्न करणे.