
प्रतिनिधी (अनिल माडपेलीवार) माहूर

माहूर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे कारगिल दिनानिमित्त दि.२६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात माजी सैनिक
ऐतिहासीक लढाया व वीर योध्यांचे
पोस्टर प्रदर्शन, निबंध, भाषण, कविता स्पर्धा, माजी सैनिकांचे भाषण किंवा मार्गदर्शन, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान, शहींदाना श्रध्दांजली मौन पाळून सन्मान हे उपक्रम राबविण्याबाबत येणार आहे.
या कार्यक्रमासाठी माहूर तालुक्यातील सर्व शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री फारुकी वासे यांनी केले आहे. भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. अनेक योध्दे क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या
संकल्पनेसाठी लढा दिला. १९९९
मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये
भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. दि. २६ जुलै हा कारगिल विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे…
हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत…