
प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

नागदेवता मंदिरात नागपंचमीच्या दिवशी भव्य कार्यक्रम; अपक्ष संचालकाच्या विजयाचा गौरव
सेवानगर (जरंग) येथील नागदेवता तीर्थक्षेत्र मंदिरात नागपंचमीच्या शुभदिनी (दि. २९ जुलै २०२५) अपक्ष संचालक, समाजसेवक आणि व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा साखर तुला आणि सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नागदेवता मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भजन, कीर्तन आणि वाजंत्रीच्या गजरात झाली. संस्थानचे अध्यक्ष विठ्ठल राउत यांच्या हस्ते रजनीकांत बोरेले यांचा सन्मान वस्त्र, टोपी, फुलमाला व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ताजी महाराज लेनगुरे (आळंदिकर), राजू काका बोरेले, माजी सैनिक अनिल पोले, रामू चौधरी, जान मोहम्मद जीवाणी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक (शिवसेना – उबाठा) आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांचाही गौरव करण्यात आला.
माजी सैनिक अनिल पोले आणि कीर्तनकार दत्ताजी लेनगुरे महाराज यांनी रजनीकांत बोरेले यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर बोरेले यांनी भावनिक भाषणात आपला संघर्ष आणि नागदेवता मंदिराचा इतिहास, शिवमहिमा व सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. “गुड तुला, लाडू तुला, आता साखर तुला होत आहे, हे माझ्या कार्याची पावती असून माझे आयुष्यातील यशोधन आहे. असे ते म्हणाले.
यानंतर ७९ किलो वजनाचे रजनीकांत बोरेले यांचा साखर तुला करण्यात आले असून तुला वजन करीता १०० किलो साखरे आणली होती. रजनीकांत बोरेले यांचा साखर तुला झाल्या नंतर. ही साखर अर्धा किलोच्या पोटल्यांमध्ये भरून प्रथम पाच महिलांना रजनीकांत बोरेले यांचा मुलगा सर्वम बोरेले याच्या हस्ते वितरित करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सुमारे ६०० नागरिकांना साखर पुडे, पुरी-भाजी, रवा शिरा आणि चणा यांचे भोजन देण्यात आले.
या सोहळ्यात ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस स्टेशनच्या पथकाने चौख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर समितीने पोलीस विभागाचे विशेष आभार मानले.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रजनीकांत बोरेले यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करत एकमेव अपक्ष विजेता म्हणून विक्रम रचला. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्तानेच विविध ठिकाणी त्यांच्या वजन तुला होत आहे.या वरुण शिद्ध होते की रजनीकांत बोरेले यांचा प्रभाव आणि समाजात त्यांची लोकप्रियता किती आहे. नागदेवता तीर्थ क्षेत्र सेवा नगर जरंग ला साखर तुला सोहळ्याचे वेळी “पुढचा तुला कधी आणि कशात होणार?” अशी चर्चा तिथे जनतेत सुरू होती
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विठ्ठल राउत, संजय जाधव, वासुदेव राठोड, अनिल पोले, तुकाराम गमे,गजानन भोगेकर,मुकेश राठोड,संतोष राउत,नंदू चौधरी,भास्कर खुरसाने,दिनेश राठोड,रावी चौधरी,सुनील परखी, नागोराव राठोड आदींसह अनेकांनी योगदान दिले. तसेच नीताताई मडावी (बोरेले), शुभम लक्ष्मीकांत बोरेले, शिवम लक्ष्मीकांत बोरेले, स्मित झाझरिया, शुभम केलापुरे,सर्वम रजनीकांत बोरेले यांची विशेष उपस्थिती होती, अशी माहिती संस्थेचे सचिव वासुदेव राठोड यांनी दिली.