
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

आदिवासी डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावताना सामाजिक भान ठेवले.
यवतमाळ – १२ ऑगस्ट
संयुक्त राष्ट्र अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट ला सहकार भवन येथे जागतिक आदिवासी उत्सव समिती च्या वतीने आयोजित कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री तर उद्घाटक डॉ बाबा येलके होते.प्रमुख अतिथी सुरेश कन्नाके केंद्रीय कार्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज, केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम,केपीजीएस राज्याध्यक्ष प्रल्हादराव सिडाम, सदानंद कुमरे निवृत्त विभागीय लेखापरीक्षक होते.
यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये जनरल तपासणी,स्त्रीरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी,रक्त लघवी तपासणी,दंत तपासणी,…
करण्यात आली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीरात डॉ.मधुकर मडावी जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी समाज बांधवांची आरोग्य तपासणी डॉ.अरविंद कुडमेथे, डॉ.संगिता मडावी,डॉ.अतुल येलके,डॉ नरेश वेटे,डॉ.आकाश कुडमेथे, डॉ चित्रलेखा कुडमेथे,डॉ उमेश मडावी,डॉ अमोल वेट्टी, डॉ प्रफुल फुलकर,डॉ दिपक नैताम,डॉ.मोहन गेडाम डॉ.हर्षल येरकाडे,डॉ किरण वेट्टी,डॉ.सायली कन्नाके,डॉ.विषाखा गेडाम,डॉ. मुकुंद सयाम यांनी तपासणी केली.
आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी जागतिक आदिवासी उत्सव समिती अध्यक्ष गुलाबराव कुडमेथे,सचिव दिलीप मसराम, उपाध्यक्ष शंकर कोटनाके,अजय घोडाम,गजानन कोटनाके, गुलाबराव मेश्राम,लक्ष्मण कुळसंगे ज्ञानेश्वर उईके, सुरेश कोडापे, रवि धुर्वे,राजेश मडावी, विजय पेंदाम,संजय मडावी,शरद उईके, वसंतराव गेडाम,ज्योत्स्ना कन्नाके, शारदा उईके, बाबाराव कुळसंगे,ज्योती कुळसंगे गजानन मडावी,नरेश उईके,संतोष गेडाम यांनी केले असे कृष्णा पुसणाके,भारत गेडाम यांनी कळविले आहे.