
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ या गावातील ग्रामपंचायत गुंडवळ अंतर्गत सर्वच विद्युत पोल वर बंद असलेले लाईट तात्काळ बसवून मिळणे अन्यथा उपोषणाचा इशारा आणि स्वच्छता करणे बाबत निवेदन सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल प्रेमसिंग राठोड आणि राहुल सतपाल कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत गुंडवळ यांनी सादर केले आहे. दि.१४/०८/२०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करीत असले बाबत दि. २९/०७/२०२५ रोजी सुद्धा निवेदन देऊनही यावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे मौजे गुंडवळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव व तांडा येथे सर्वच विद्युत पोलवरील लाईट बंद असून गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे याकडे ग्राम विकास
अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून पावसामुळे जमिनीतील विंचू, साप व इतर विषारी कीटक जमिनीवर संचार करतात, तसेच ग्रामपंचायत गुंडवळ अंतर्गत गाव व तांडा दोन्हीही जंगला लगत असल्याने वन्यप्राणी बिबटे, अस्वल, रानडुक्कर
व इतर हिंस्त्र वन्य प्राणी रात्रीला गावात संचार करीत असतांत त्यामुळे रात्रीच्या
वेळी नागरिकांना अचानक निर्माण झालेलीं आणीबाणी आरोग्य समस्या व इतर
कारणासाठी घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. करिता गाव व तांड्यातील
विद्युत पोलवरील बंद असलेले विद्युत लाईट ताबडतोड सुरु करणे आवश्यक आहे.
तसेच गावात ठिकठिकाणी अस्वच्छता असून त्या ठीकाणी संसर्गजन्य रोग
पसरवीणारे कीटक निवास करीत आहेत. ज्यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत दि.२९/०७/२०२५ रोजी आपणाकडे निवेदन
सादर करून सदर बाब आपल्या निदर्शनास आणून दिली. तरी सुद्धा सदर बाबीची दखल घेतली नसल्याने सदर बाबीचा आम्ही या व्दारे तीव्र निषेध करतो. सदर प्रकरणी तातडीने दखल घेऊन
कार्यवाही न झाल्यास दि. १४/०८/२०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालय
गुंडवळ समोर बेमुदत आमरण उपोषण करणार अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल प्रेमसिंग राठोड आणि राहुल सतपाल कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत गुंडवळ यांनी सादर केले आहे. दिलेले आहे.