
प्रतिनिधी विशाल येलोरे केळापूर
मोहदा येथील ग्रामपंचायत व सरपंच अक्षय मेश्राम यांच्या पुढाकाराने गावतील सर्व ८ अंगणवाडी मध्ये महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत लहान मुलांना ड्रेस व उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.व तसेच अंगणवाडीत आवश्यक असणारे पोषण आहार सामग्री ,खेळणी या साहित्याचे वाटप या कार्यक्रमाद्वारे करण्यात आहे.असाच लहान मुलांचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे. यापुढे ही असेच विकासात्मक कार्यक्रम करत राहू अशी ग्वाही सरपंच अक्षय मेश्राम यांनी दिली. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका,मदतनीस व पालक वर्ग उपस्थित होते.
