
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

बंजारा तीज हा एक पारंपारिक सण आहे जो बंजारा समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे विशेष महत्व आहे आणि त्याच्या साजऱ्या करण्याच्या पद्धतीतून बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा दिसून येते.नारळी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या दहा दिवसाच्या तिज महोत्सव
माहूर मध्ये श्री सेवादास नगर येथे तांड्याचे नाईक श्री पांडुरंग दगडू राठोड, कारभारी विष्णू पिराजी जाधव, सुभाष पवार, प्रेम सिंग राठोड, वसंतराव चव्हाण, रोहिदास राठोड, प्रेमसिंग राठोड, सुरेश राठोड, व युवा पिढी तसेच कुमारिका, आणि महिला भगिनी यांच्या पुढाकाराने तीज उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. संत सेवालाल महाराज यांना नैवेद्य दाखवून पूजा अर्चना करून मिरवणूक काढण्यात आले मिरवणूक सेवादास नगर येथून थेट पैनगंगा नदीवर नेऊन विसर्जन करण्यात आले. आणि सणाचे समारोप करण्यात आले. या उत्सवामुळे बंजारा समाजाचे सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा, आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी या उत्सवानिमित्ताने प्रार्थना करतात.