
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

मागील बारा वर्षांपासून सतत ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्या व पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याचे काम नेहमीच पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून करीत आलो आहे. त्यातच नव्याने दूरदर्शन मुंबई म्हणजेच सह्याद्री दूरदर्शनपदी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून नव्याने नवीन जबाबदारी मिळाली म्हणूनच आमचे सहकारी मित्रांनी यवतमाळ येथील शासकीय रेस्ट हाऊस व माझ्या राहत्या घरी , माझी पत्नी व माझ्या मुलीसह माझा सत्कार करण्यात आला.
तसेच सत्कारामध्ये दिलेल्या वस्तूचा आनंद नसून माझ्यासाठी सहकुटुंब सहपरिवार सत्कार हा अतिशय महत्त्वाचा असून सदर सत्कार यामध्ये दिलेल्या ट्रॉफीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चांदीची प्रतिमा विशेष महत्त्वाची हे मात्र नक्कीच खरे… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेरणीतून व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून नक्कीच मला वेळोवेळी सहकार्य लाभले आहे व या दोघांच्याही आशीर्वादाने मला नवे बळ नवी प्रेरणा जागृत झाली , येणाऱ्या काळात नक्कीच मी संधीचे सोने करेल व सत्कार कर्तव्यांची प्रेरणा घेऊन नव्याने माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करेल.
माझा सहपरिवार सहकुटुंब सत्कार करताना आमचे मोठे बंधू कैलासभाऊ विंचुरकर ,( अखिल भारतीय सोनार समाजाचे राष्ट्रीय सचिव ) , अमरभाऊ ताऺडेकर (राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष ) व
राजेंद्रभाऊ तांबेकर ( राष्ट्रीय उद्योग भारत विदर्भ प्रांत संयोजक ) या सर्वांचे माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार