
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राज्यव्यापी अधिवेशन संपन्न, पदाधिकारींना पैठणी व विमा चे वाटप
:- जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पहिले राज्य व्यापी अधिवेशन नासिक येथिल निसर्ग रम्य वातावरण असणार्या गरुडझेप अँकाडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या वेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांना अपघाती विमा योजना, पत्रकार बांधवांच्या पत्नी साठी पैठणी साडी व आकर्षक भेट वस्तू प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यकमाचा अध्यक्षस्थानी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नासिक ग्रामिण पोलीस दलाचे पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले, दै महासागर चे संपादक जेष्ठ पत्रकार प्रा जयंत महाजन, जागर जनस्थान चे मुख्य संपादक समिर चव्हाण, गरुडझेप अँकाडमी चे व्यवस्थापक प्रा लक्ष्मण डोळस, माजी नगरसेवक दिनकर आण्णा पाटील, दै महासागर चे कार्यकारी संपादक सुधीर उमराळकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश सावंत,अल्पसंख्यांक सेलचे तन्वीर तांबोळी, गुड्डू सय्यद यांच्या सह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, राष्ट्रीय सल्लागार अन्वर पठाण, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष अकिल पटेल, नासिक जिल्हा महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्ष वृषाली साळुंकी, नासिक शहर अध्यक्ष शोहेब शेख यांच्या सह पोलीस मित्र समिती चे राज्य अध्यक्ष आनंद दाणी, दिव्यांग सेवा समिती चे राज्य अध्यक्ष सुकदेव खुर्दळ, अन्याय अत्याचार निवारण समिती चे राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते
दिप प्रज्वलनाने कार्यकमाची सुरवात करण्यात आली तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा जयवंत महाजन यांचे पत्रकारिता काल आज आणी उद्या या विषयावर व्याख्यान झाले तर वासुदेव देसले व समिर चव्हाण यांनी पत्रकारिता कशी निर्भीड करावी या विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक पदाधिकारी यांना अपघाती विमा, भेटवस्तू व त्यांच्या पत्नी साठि पैठणी साडीचे वाटप करण्यात आले
या वेळी यवतमाळ, अकोला, पुणे, अहिल्यानगर, नासिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ातील पदाधिकारी तसेच सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, नासिक शहर येथिल पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते
बॉक्स
……………………………………….
राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथील नवजीवन तालुका प्रतिनिधी व महाराष्ट्र क्रांती न्युज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सोशल मीडिया, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे. रजत चांदेकर यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्याचं बरोबर महिला यवतमाळ जिल्हाध्यक्ष रंजना आडे उपाध्यक्ष.प्रमोद मेटांगे कार्याध्यक्ष.वीरेंद्र चौहान तालुका कार्यकारणी
दिग्रस तालुका अध्यक्ष.अशोक जाधव उपाध्यक्ष.किशोर कांबळे उमरखेड तालुका अध्यक्ष.अतिश वटाने महागांव तालुका अध्यक्ष.सनी चौहान कळम तालुका अध्यक्ष पवन जाधव पांढरकवडा तालुका अध्यक्ष राजीव आगरकर
यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे यांची निवड झाल्यामुळे सर्वाकडून शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला
जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, महिला विभागाच्या राज्य अध्यक्ष मनिषा पवार, राज्य उपाध्यक्ष सुधिर उमराळकर व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश बागुल यांच्या आदेशानुसार जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी रजत रामाजी चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते संपुर्ण जिल्हात जनकल्याण मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणी
यवतमाळ कार्यकारणीतील सर्व सदस्या चे स्वागत आणी खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे
देविदास बैरागी
राज्य अध्यक्ष
जनकल्याण मराठी पत्रकार संघ (भारत)
कार्यकमाचे यशस्वी नियोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नासिक जिल्हा व नासिक शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले