
प्रतिनीधी नरेश राऊत राळेगाव

दिनांक १७/०८/२०२५ रोजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मा. श्री.प्रफुल वासुदेव नान्ने यांची निवड करण्यात आली. श्री. प्रफुल नांन्ने हे एक पत्रकार सोबतच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे. प्रफुल नांन्ने यांनी वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन जन सामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असतात. तसेच अनेक वेळा गरजू लोकांना रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून लोकोपयोगी कार्य पार पाडले. अत्यंत साधे राहणीमान असणारे प्रफुल नांन्ने यांनी आपल्या समाजकार्याचे श्रेय कधीच घेतले नाही. आपण समाजात वावरताना समाजाला आपण काही देणे लागतो, लोकांसाठी चांगले कार्य केले तर ते, आणखी लोक अनुसरण करून समाजात एक चांगला संदेश नवीन पिढीत रुजवला जाऊन, सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल या भावनेने प्रेरित होऊन आपले सामाजिक कार्यात कधीच खंड पडू देत नाही. या सर्व सामाजिक कार्य लक्षात घेता, भोई समाज युवा मंच प्रमुख,कोअर कमिटी,तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तुषार भाऊ साटोटे यांच्या सूचने नुसार तसेच विदर्भ अध्यक्ष श्री.प्रविण भाऊ कोल्हे यांच्या मार्फत निवड करण्यात आली समाजकार्याची दखल घेऊन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मा. श्री.प्रफुल वासुदेव नान्ने यांची निवड करण्यात आली आहे. त्याना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कडून तसेच संजय भाऊ इंगळे भोई समाज युवा मंच महाराष्ट्र यांच्या तर्फे व मित्र परिवार बंन्डुजी नांन्ने,अरविंद झाडे,रमेश शिवरकार,गणेश कोरडवार,अश्विन ठाकरे,गणेश नांन्ने,अभि बेले,दिलीप टेकाम,प्रफुल शिवरकार,निलेश शिवरकार,प्रसाद ढोपटे,चेतन सामजवार,मनोज नांन्ने,कुणाल कणाके,प्रदीप नांन्ने,शंकर शिवरकार,पुंडलिक नांन्ने,मनःपूर्व अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.