
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

राळेगाव :-पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे.एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन पर्यावरण संवर्धन व विकास समिती राळेगांव तालुका संघटक अरविंद कोडापे यांनी वाढदिवसानिमित्त रोपटे लावून वाढदिवस साजरा केला. मित्रांनी अरविंद कोडापे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या,याप्रसंगी अरविंद कोडापे यांचे वडील झित्रुजी कोडापे, ग्रा.पं.कर्मचारी हिंम्मत कुळसंगे,महादेव खंगारे,मयूर मुर्खे,शेखर चामलाटे,नयन जुमनाके,समिर चामलाटे, सुजल मरसकोल्हे, तेजस चामलाटे उपस्थित होते.