प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

माहूर येथील शिवश्रद्धा गणेश मंडळाच्या गणपतीला किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा नियोजन बैठकीतून सभामंडप मंजूर केला होता. गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. त्यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आ. केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत वेद मंत्राच्या जयघोषात गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, तालुका सरचिटणीस विनायक मुसळे, अनिल वाघमारे, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, सुरेश गिऱ्हे, शामराव कुमरे, रामकृष्ण केंद्रे आदींची उपस्थिती होती.
शिवश्रद्धा गणेश मंडळाचा गणपती हा मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वदूर प्रख्यात आहे. सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर गणपतीची प्रतिष्ठापणा व आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष जय ताडेवार व इतर पदाधिकाऱ्यांनी आ. भीमराव केराम यांचेसह उपस्थित मान्यवारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक विजय कामटकर,नंदकुमार जोशी,जयकांत मोरे,निलेश जयस्वाल, शुभम ठाकूर, नंदू कोलपवार, नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड, लेखापाल विशाल मरेवाड, विजय शिंदे यांचेसह गणेश मंडळाचे पदाधिकारी व भक्तमंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. नगरसेवक गोपू महामुने यांनी आपल्या भाषणातून सभामंडप मंजूर केल्याबद्दल आ.भीमराव केराम यांचे आभार मानले. तसेच बांधकामासाठी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल बाबुराव आचकुलवार व दत्ता पराते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

