
प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

दिनांक 02/08/2025 ला यवतमाळ येथे नागभूमी बुद्ध च विहारांमध्ये आजाद समाज पार्टी मार्फत प्रबुद्ध भारत व आजाद समाज पार्टी कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा घेण्यात आला.सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ देवरे प्रदेश उपाध्यक्ष आजाद समाज पार्टी (कांशीराम) हे होते,प्रदेश महासचिव शिलानंद कांबळे,रवींद्र फुले विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष ,किशोर मानकर महासचिव पश्चिम विदर्भ,जॉनट्टी विनकरे पश्चिम यवतमाळ जिल्हा अध्यक्ष,डॉ मदन वरघट पूर्व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष,संतोष भाऊ जोगदंड जिल्हा महासचिव यवतमाळ,आशिष खडसे उपाध्यक्ष पश्चिम यवतमाळ,देवानंद भारत पाईकराव,विष्णुकांत पुंजाराम वाडेकर उमरखेड ,सचिन कोंडबा वाहूळे महासचिव, एडवोकेट देवेंद्र मानकर यवतमाळ,विश्वास चिंतामण देवतळे आर्णी,धम्मपाल लिंगायत आर्णी,उत्तम भगत यवतमाळ,अनिल मानकर,अनिल विठ्ठल वानखडे यवतमाळ,दिलिप वाळके लोहारा,आनंद राजाराम वंजारी आर्णी,रवींद्र भोंगाडे यवतमाळ
एडवोकेट देवेंद्र मानकर यांना यवतमाळ जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. उत्तम भगत यांना पश्चिम यवतमाळ
पदाची जबाबदारी देण्यात आली, विश्वास चिंतामण देवतळे यांना आर्णी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. प्रमोद श्रीराम तायडे यांना कळब तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली .आणि विठ्ठल मानकर व दिलीप वाळके यवतमाळ शहर सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली.एडवोकेट भाई चंद्रशेखर आझाद यांचा झंजावत संपूर्ण देशामध्ये वेगाने वाहत आहे. सर्व तरुण मंडळी, एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटी बांधवांनी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. गौरी प्रसाद उपासक केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र राज्य रुपेश जी बागेश्वर महाराष्ट्र प्रभारी मनीष भाऊ साठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आजाद समाज पार्टीची घोडदौड जोरात चालू आहे.आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका ,नगरपंचायत व नगरपालिका या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले आणि कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.