प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

एका 38 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथे आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या उघडकीस आली.
वितुल बंडुजी महाजन वय 38 वर्ष राहणार बोरी इचोड असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वितुलने पहाटेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी विष प्रशन केले होते त्यामुळे त्याला तात्काळ वर्धा जिल्ह्यातील मेघे सावंगी येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा सकाळी १० वाजता मृत्यू झाला
वितुल हा वडिलोपार्जित शेती करायचा मात्र गेल्या काही दिवसांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीपणा मुळे वितुल हा विवंचनेत राहायचा
त्यामुळेच वितुलने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे गावातील नागरिकांमधून बोलले जात आहे.त्याचे पश्चात आई वडील,पत्नी एक मुलगा,भाऊ असा आप्त परिवार आहे.

