संपादक नागेश रातोळे ढाणकी

प्रभाग क्रमांक 16 येथील मुख्य रस्त्यावरील गुरुदेव ड्रेसेस जवळील अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा व रापट्याची आठवडाभरात दुरुस्ती न केल्यास आझाद समाज पक्षाच्या वतीने त्याच खड्ड्यात अर्ध दफन आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपंचायत ढानकी यांना गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी देण्यात आला,
प्रभाग क्रमांक 16 येथील रहदारीसाठी सध्या मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहतुकीमुळे रापटा तुटून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे, या खड्ड्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे, याच रस्त्याने शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी रुग्णालयात जाणारे पेशंट व नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करतात मात्र मुख्य रस्त्याच्या रापट्यावर एका खड्डा तयार झाल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, नादुरुस्त रापट्या मुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, तसेच सदर खड्डा व रापटा वारंवार मागणी करणे दुरुस्त होत नसल्याने आठ दिवसाच्या आत खड्डा आणि रापटा दुरुस्त न केल्यास आझाद समाज पक्षाच्या वतीने त्याच खड्ड्यात अर्ध दफन आंदोलन छेडण्याच्या इशारा मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी, सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड, पोलीस स्टेशन बिटरगाव यांना देण्यात आला यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे, शहराध्यक्ष गोलू भाऊ मुनेश्वर, समाधान राऊत आबा गायकवाड शब्बीर भाई, प्रदीप गायकवाड यांनी दिला आहे

