प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक काँग्रेस पक्ष ताकदीने
लढणार वाई बा. व वानोळा जि. प. गटात उमेदवारी
मिळण्यासाठी अनेक जण इच्छुक असून भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाची उमेवारी मिळविण्यासाठी प्रयत्न शील असल्याची माहिती वानोळा जि. प. गटात माजी जि.प. सदस्य स्व.दतरामजी राठोड यांचे सुपुत्र कृष्णकुमार राठोड यांनी दिली. हे इच्छुक असून चारही पं.स. गणात सुद्धा लढाऊ व अभ्यासू कार्यकर्त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देणार असून वानोळा, गोंडवडसा व हडसनी गणात सुद्धा अनेक जण पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून माहूर तालुक्यातील सर्वसामान्य
नागरिक कष्टकरी शेतमजूर व शेतकरी यांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेले कार्य देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधीपक्षनेते खा. राहुल गांधी यांचा नफरत के बाजार मे मोहबत की दुकान चालविण्याचा कानमंत्र कट्टर काँग्रेसीनी आत्मसात केलेला आहे. आगामी जि.
प.,प.स. सार्वत्रिक निवडणुकीत माहूर तालुक्यातील दोन्ही जी.प.
गटातून आगामी निवडणुकीत तगडे उमेदवार उभे करण्यात येईल असे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडे हे दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता कपिलेश्वर धर्मशाळा येथे घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये वानोळा जिल्हा परिषद गटातून कृष्णकुमार राठोड यांनी तिकीट ची मागणी केली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास हमखास विजयश्री खेचून आणू असा विश्वास मुलाखती मधून जिल्हाध्यक्ष राजेश जी पावडे व पक्ष निरीक्षक बालाजी चव्हाण तसेच जिल्हा सचिव अनिल पाटील चिमेगावकर व अल्पसंख्यांक आघाडीचे अजिज कुरेशी त्यांच्याकडे मागणी केली.
कृष्णकुमार राठोड हे स्वर्गवासी दत्तरामजी जयराम राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना शिक्षण महर्षी म्हणून त्यांची तालुक्यात ओळखल्या जात होते. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे ते विश्वासू होते त्यांचाच वारसा पुढे नेण्याकरिता वानोळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षातर्फे प्रबळ दावेदार म्हणून पक्षाकडे मागणी केली.


