
प्रतिनिधी विशाल येलोरे केळापूर

मोहदा – येथून जवळच असलेल्या
स्व.सुर्यभानजी नाईक उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय-मिरा( जिरा), पं.स. पांढरकवडा येथील पात्र विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत 24 सायकलिंचे वाटप पांडरकवडा येथील बिईओ मा.मेश्राम साहेब, केंद्र प्रमुख चव्हाण साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवलकिशोर राठोड , संस्थेच्या सचिव सौ.प्रज्ञाताई नवलकिशोर राठोड, मिरा सरपंच दंडाजे, विनेश राठोड- पोलीस पाटील-मीरा यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक किर्तीवार सर, बारी सर, भगत सर, राठोड सर, चव्हाण सर, उले सर, मंगाम सर, लिपिक सपाटे तथा सर्व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग राठोड, आडे, जाधव, कुमरे यावेळी आवर्जून उपस्थित होते.