प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

गुजरी गावची परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच होती. शाळा जाणाऱ्या मुलांना शेजारच्या गावात खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. सर्वसामान्य लोकांना वृद्ध,महिला आणि आजारी लोकांना उपचारासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
राळेगाव तालुक्यातील गुजरी हे एक छोटस गाव आज ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही ज्या गावात बस सेवा उपलब्ध नव्हती.तिथे अखेरl पहिल्यांदाच आज वर्धा जिल्ह्याला जोडणारी राज्य परिवहन विभागाची *लाल परी* बस दाखल झाली.या दृश्याने केवळ धुळीने भरलेले रस्तेच उजळून निघाले नाहीत तर वर्षानुवर्षे बस सेवेची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांची मनेही उजळून निघाली.
देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असतानाही, गुजरी नागठाणा सारखी गावे दुर्लक्षित राहण्याचा सामना करत होती. याची वेदना गावकऱ्यांच्या हृदयात खोलवर होती. पण आशेचा दिवा विझला नाही.गावातील मंडळीसह प्रयत्न सुरू ठेवले.अखेर तो दिवस आला जेव्हा लालपरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहनची बस गुजरी गावाच्या हद्दीत दाखल झाली.ही बातमी गावात पसरताच, मुले, वृद्ध, महिला सर्वजण रस्त्यावर आले.राळेगाव गुजरी नागठाणा सावरगाव मार्गे वर्धा या बस सेवेने सर्व सामान्याची यवतमाळ जिल्ह्याची नाळ वर्धा जिल्ह्याशी नव्याने जोडण्यात आली.याकरीता आगार प्रमुख बोकडे साहेब राळेगाव यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार अखिल धांदे यांच्या कडून आला, पेंदोर साहेब,महेश गलांडे लिपिक, चालक व वाहक यांचा सत्कार गावकऱ्यांकडून करण्यात आला. लाल परीचे नारळ फोडून व फुले उधळून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अखिल धांदे गणेश बाकडे, गंगाधर घोटेकर, भाऊरावजी वऱ्हाडे,अशोक सावरकर, पुरुषोत्तम शिरपूरकर, बाळकृष्ण कारमोरे,गोविंदराव झोड,निलेश पेंढे,मंगेश गोंडे,यश मडावी,तेजस कांबळे व इतर ग्रामस्थ गुजरी नागठाणा उपस्थित होते.

