
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

माहूर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता कारगिल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वीरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिरुद्ध केंद्रे यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सुद्धा मार्गदर्शनपर शूरवीर यांची गाथा आणि त्यांच्या अमरतेवर प्रकाश टाकला. माजी सैनिक बी. एल. यांनी कारगिल युद्ध बद्दल अनुभव विशद केले, कार्यक्रमासाठी तालुक्यातील माजी सैनिक यांना पाचारण करण्यात आले, माजी सैनिक बी. एल. काळे, पवनजी यादव, विजय पवार, राजाराम बागुलवार, काशीराम आर.के., बळीराम कुडमते, पी. आय. मनोज कुडमते, (सेवानिवृत्त) उपअधीक्षक भूमी अभिलेख तुकाराम पेंदोर, माजी सैनिक व्ही. के. पवार या सर्वांचे स्वागत करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान प्रमुख उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, उपाध्यक्ष समाधान कांबळे, सदस्य अंबादास मुकटे, सदस्य गोपाल चव्हाण प्रामुख्याने यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेचे IMC सदस्य श्री संजय सुरोशे, सतीश कान्नव, श्री बेडारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री फारुकी वासे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशिका व्ही. एन. पोतदार आणि तसेच शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.