
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

माहुर येथे दिनांक 14/08/2025 रोजी सकाळी 11.00 वा. हिरकणी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे
तांत्रिक ज्ञानाबरोबर सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्य याबाबत
प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री हिमालय राऊत, सहाय्यक प्राध्यापक शिवाजी महाविद्यालय उदगीर. यांना पाचरण करण्यात आले. महिन्यातून एकदा सामाजिक प्रबोधनपर
कार्यक्रम घेण्याचे निर्देश कौशल्य मा.श्री. मंगलप्रभात जी लोढा मंत्री कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून दर माह मासिक प्रबोधन कार्यक्रमा अंतर्गत विभाजन विभिषिका दिवस साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य
श्री. फारुकी ए. वासे यांनी केले आहे.