माहूर प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने कपिलेश्वर धर्मशाळा येथे माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे बैठक आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये काँग्रेसचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश जी पावडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली माहूर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषदा व चार पंचायत समिती मधील इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेण्यात आले.
बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडे यांच्या समवेत कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण पक्ष निरीक्षक व अजीज कुरेशी शहराध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी अनिल पाटील चिमेगावकर, भजावि ज चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, काँग्रेस प्रवक्ता जयकुमार अडकिने, नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शेख जब्बार, नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपडाळे, विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहेरे, शहराध्यक्ष अजीम सय्यद, नगरसेवक प्रतिनिधी राजू सौंदलकर, नगरसेविका कविता राजू सोंदलकर, निसार कुरेशी, नगरसेविका सागर राठोड, विक्रम राठोड, माजी सभापती अश्विनी आनंद पाटील तुपदाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बैठकीचे आयोजन नांदेड जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी आनंद पाटील तुपडाळे यांनी केले माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

