प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ
कळब:-मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन, या सारखी महत्वाची पिके ही सडली असून, शेतकऱ्यांच्या हातात येणारे सोयाबीन पीक पूर्णत: नष्ट झालं आहे. शेतकऱ्याचे घर, गोठे, शेतीचे उपकरणे, या अतिदृष्टीमुळे खराब झाले आहे. यापार्श्वभूमीवर कळब तालुका ओलादुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान जाहीर करावे. या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष कळब तालुका अध्यक्ष. दिलीप डावरे जिल्हाध्यक्ष. पिंटूभाऊ डानगे युवाजिल्हाध्यक्ष. प्रवीण ढाकुलवार. आशिष पोंगाडे. निलेश राठोड. अन्य शेतकरी मोट्या संख्येने उपस्थित होते. यांच्यावतीने तहसीलदार धीरज थूल यांना निवेदन देण्यात आले.

