
प्रतिनिधी रमेश सातपुते अर्धापूर

_धुळीतून निघालं अन् फुफाटयात पडलं_
कामठा (बु ) दि.१९ (वार्ताहर ):नांदेड वरून कामठा (बु )गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून ये जा करणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. हा रस्ता नांदुसा,कामठा (बु), गणपुर, कोंढा, भोगाव, देळूब या गावासाठी महत्वाचा आहे.जिल्याच्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या कामासाठी हा रस्ता वापरला जातो. कामठा (बु)ते खुरगाव पाटी ५ किमी अंतर असून सिमेंट रस्तामंजूर झाला आहे. परंतु ४ किमी अंतर असलेला मध्य भागी रस्त्याचे अपूर्ण काम राहिले आहे. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात वाहतूकीसाठी त्रास होत आहेत आणि या सर्व गावांतील शेतकऱ्यांना, महिलांना, मजूरांना अत्यंत त्रास होत आहे. कामठा व नांदुसा गावांतील गावकऱ्यांनी यासाठी प्रशासनाला वारंवार विनंती करून सुध्दा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नांदुसा गावापासून रस्ता छोटा होत आहे म्हणून गावातील व्यक्तींनी हा रस्ता रोखला पण होता. या रस्त्याचे काम फार हळुवार चालत आहे असे संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला पावसामुळे खडक मिळत नाही असे ते सांगत आहेत. मग खडक मिळत नाही तर पावसाळ्यात रस्ता अगोदरचा काढला कशाला असा गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. एका साईडचा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत असतांना तोही रस्ता खोदून ठेवला. त्यामुळे वाहन धारकांची तारेवरची कसरत होत आहे. धुळीतून निघालं अन् फुफाटयात पडलं अशी अवस्था झाली. तरी संबधित अधिकाऱ्यांनी त्वरित
या राहिलेल्या रस्त्याचे काम किमान एक बाजू तरी पूर्ण करावी.अशी मागणी कामठा (बु)व नांदुसा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.