
वडकी महावितरण ची अलगर्जी पणा अभियंत्याच दुर्लक्ष

प्रतिनिधी/राळेगाव नरेश राऊत
राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येते गेल्या आठ दिवसा पासून लाईन असून गावकरी अंधारात आहे गावातील डिपी चा टान्सफार्म जाऊन असून वडकी महावितरण ला वारंवार माहिती देऊन सुद्धा अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे गावाकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याला जबादार कोण तरी पण वरिष्ठ अधिकारी यांच दुर्लक्ष होत असल्याच दिसत आहे
वारंवार लाईन खंडित होत असल्यामुळे विहिरगाव येथील नागरिक त्रस्त
विध्युत सतत खंडित होत असल्या मुळे गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालय वडकी यांच्यावर संताप वेक्त केला आहे विध्युत उपकरणे लहान मुलांना होणारा त्रास तसेच आजारी वय वृद्ध वेक्तींना होणारा त्रास गावातील शेतकऱ्याच्या ऑनलाईन कामामध्ये व्यक्तंय येत असून कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून गावातील विध्युत प्रवाहच्या पेठ्या अस्ता वेस्ट झाल्या आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे गावातील एखादी फेज गेला असता गावातील नागरिकांना स्वतः जाऊन फेज टाकावा लागतो आपल्या जीवावर बेतून हे सर्व काम करावे लागत आहे या मध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण या सर्व बाबीचा आढावा घेऊन त्वरित यावर कार्यवाही करावी असे विहिरगांव येथील नागरिककातून बोलले जात आहे
——————बॉक्स ——————-
*गावातील खंब्या वरून डायरेक्ट लाईन टॉवर ला*
गावामध्ये airtel च टावर होऊन एक वर्ष उलटून गेले असून सुद्धा टावरला अजून डिपी कनेक्शन बसवलेलं नाही फक्त डिपी उभी करून शोभेची। वस्तू दिसून राहली आहे डायरेक्ट गावातल्या खंबावरून टावरला लाईन पोहचवलि जात आहे एवढं महाभारत चालू असून सुद्धा वरिष्ट अधिकाऱयाचे दुर्लक्ष होत आहे फक्त आणी फक्त वसुली करून पैशे जमा करण्याच्या तालात कर्मचारी दिसून येत आहे या सर्व कामाला अभय कुणाचे वरिष्ठ अभियंता की कर्मचारी यांचे सहकार्य असल्याच दिसून येत आहे.