
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

दि. 22 ऑगस्ट 25 रोजी माहूर शहरात बैल पोळा सणा निमित्त बैल जोडी सजावट स्पर्धा व बळीराजा सन्मान करण्याचे आयोजन करण्यात आले असून , या स्पर्धेत विजेत्या बैल जोडीला बक्षिसांचे वाटप होणार असून बळीराजाचा सन्मान करण्यात येणार आहे.
बैल पोळा निमित्त दि.22 ऑगस्ट 25 रोजी बैल जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन माहूर नगरीत होत असून येथील युवक व व्यापारी वर्गा कडून करण्यात येत आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट सजावट केलेल्या विजेत्या बैल जोडीला प्रथम बक्षिस श्री योगी कृषी केंद्र माहूर यांचे कडून. 9001 /-रु, तर द्वितीय बक्षीस न्यू सुखकर्ता कृषी केंद्र माहूर यांचे तर्फे 7001 /-रु तृतीय बक्षिस न्यू मेघा कृषी केंद्र माहूर यांचे तर्फे 5001 /-रु ,चतुर्थ बक्षिस श्री जगदंबा किराणा माहूर यांचे कडून 3100 /- पाचवे बक्षीस श्री जय भवानी गणेश मंडळ बारीपूरा माहूर यांच्या तर्फे 2100 / सहावे बक्षीस श्री शिवश्रद्धा गणेश मंडळ 1100 / यांचे तर्फे देण्यात येणार आहे या स्पर्धेचे आयोजन सुरेश गिऱ्हे, संतोष गंदेवाड, संतोष जयस्वाल,अशोक उप्पलवाड, गजानन जयस्वाल, परेश देशपांडे, अशोक आचकूलवार, गजानन शेद्दलवार, आडेलू कन्नेवाड,अजय पोपुलवार, सुनील सूर्यवंशी यांचे तर्फे करण्यात आले असून. बळीराजाने आपल्या बैल जोड्याची उत्कृष्ट सजावट करून पोळ्या मधे अनाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण दुसऱ्या दिवशी दि. 23 ऑगस्ट 25 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 10 वा. आयोजित केला असून याच वेळी बळीराजाचा सन्मान ही करण्यात येणार आहे.