माहूर (प्रतिनिधी) अनिल माडपेलीवार

वाई बाजार सर्वसाधारण तर वानोळा ओबीसी जनरल सुटल्याने इच्छुक उमेदवारांच्या संख्येत होणार वाढ
दिग्गजासमोर पक्ष वाढविण्यासाठी अतितटीच्या होणाऱ्या लढाईत तगडे उमेदवार देण्याचे आवाहन
माहूर येथील पंचायत समितीच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात सोमवार दि.१३ ऑक्टो. रोजी दु. 3 वा. सहायक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत व तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत बालकाचे हस्ते चीठ्ठी काढून कोणत्या समितीच्या चार गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील वाई बाजार आणि वानोळा या दोन्ही गणात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने पक्ष आणि दिग्गजासमोर आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी तगडे उमेदवार मैदानात उतरवण्यासंबंधी मोठे आव्हान उभे राहिले असून आरक्षण बैठकीत पक्षप्रमुख हजर नसले तरीही इच्छुक उमेदवार हजर राहून त्यांना खबर देत असल्याने आरक्षण जाहीर होताच गोट्या फिट करण्याचे जातीपातींना जवळ करण्याचे मनसुब्याची आखणी लगेच झाल्याने उमेदवारी मिळेलच या आहेत इच्छुक असलेले कार्यकर्ते आनंदात दिसत होते
माहूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे वाई बाजार व वानोळा असे दोन गट तर पं. स. चे एकूण 4 गण आहेत. सोमवारच्या आरक्षण सोडतीत वानोळा गण सर्वसाधारण महिला, हडसणी गण अनुसूचित जमाती महिला, वाई बाजार गण सर्वसाधारण व गोंडवडसा गण ओबीसी करिता आरक्षित झाला आहे. जि.प.गटाच्या आरक्षण सोडतीत वाई बाजारगट सर्व साधारण व वानोळा गट ओबीसी करिता आरक्षित झाल्याने दिग्गजांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहूर पं. स. चे सभापती पद सर्वसाधारणसाठी असल्याने जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत काटेरी लढत होणार असल्याचा कयास लावला जात आहे. आरक्षण सोडती करिता सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूलां तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलाश जेठे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांचे सह अधिकारी कर्मचारी तसेच इच्छुक उमेदवारासह राजकीय जाणकार पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

