
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

दलीत पीडित कष्टकरी शेतकरी सोशीत वंचितांचा आवाज
त्यांच्या दुःख वेदना शब्दबद्ध करुन समृद्ध साहित्य निर्माण करणारे विलक्षण प्रतिभावंत , लेखक. साहित्यिक, समीक्षक, कलाकार, कवी, लोकशाहीर, नेता, वक्ता, कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी माहूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जुनी नगर पंचायत प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यात एकावन्न युवकांनी भाग घेतला होता.महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या माहूर तालुका अध्यक्ष तथा माहूर पोलिस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समितीचे अध्यक्ष सौ.नम्रता मनोज किर्तने या एकमेव महिलेने रक्तदान केले आहे.आत्तापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी बारा वेळा रक्तदान केले आहे हे विशेष.सायंकाळी चार वाजता शहरातून अण्णाभाऊंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने देवानंद भांडवले यांनी दिली.