
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केली पार्किंग आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी
विद्युत रोषणाई पार्किंग सुरक्षा व्यवस्था पिण्याच्या पाण्यासह नियंत्रण कक्ष मातृ मातृ तीर्थ अन्नछत्र परिक्रमा मार्गाची केली पाहनी.
नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त होणारी गर्दी आणि येणाऱ्या भाविकांची सर्व प्रकारचे व्यवस्था व्हावी भाविकांना त्रास होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी स्वतः मुख्याधिकारी विवेक कांदे पोलीस निरीक्षक गणेश कराड नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिक्रमा यात्रेत श्री दत्तात्रेय संस्थान शिखर देवस्थान सह संपूर्ण जंगल आणि सर्वच देव स्थानावर लाखो भाविक पायी परिक्रमा यात्रा करणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस नगरपंचायत वनविभाग देवस्थानसह इतर विभागांच्या वतीने शहरातील प्रमुख यात्रा केंद्राच्या ठिकाणी केलेल्या तयारीची पाहणी करून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सूचना केल्या
माहूर गडावर भरणाऱ्या प्रमुख यात्रेपैकी परिक्रमा यात्रा ही मोठी असून यावर्षी ती ८ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या दोन दिवसा दरम्यान भरणार आहे. या यात्रेत लाखो भाविक 21 किलोमीटरची परिक्रमा यात्रा पार पाडणार असल्याने नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनीही 400 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक कुठे कुठे करण्यात आली याची सविस्तर माहिती दिली
शहरातील टी पॉइंट ते मातृतीर्थ तलावाकडे जाणारा रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी असते या ठिकाणी विद्युत व्यवस्था तसेच पोलीस आरोग्य विभाग वन विभाग याचा इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी कुठे कुठे तैनात होणार आहेत याची सविस्तर माहिती घेतली तसेच मातृतीर्थ कुंडावर प्रत्येक येणारे जाणारे भाविक पवित्र स्नान करतात त्यामुळे येथे जीव रक्षक दलाचे किती जवान तैनात करण्यात आले याचीही माहिती घेत समाधान व्यक्त केले तसेच येणारे भाविक प्रत्येक देवस्थानवर दर्शनासाठी जातात त्यांचेही महाप्रसाद आणि सुरक्षा व्यवस्था ची माहिती घेतली
यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते