
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

श्री दत्त शिखर माहूर संस्थांचे महंत परम पूज्य श्री मधुसूदन जी भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्त नाम सप्ताह आणि पंचकोशी परिक्रमा यात्रेचे भव्य दिव्य आयोजनामध्ये दिनांक 8/8/2025 रोजी अंदाजे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती पहावयास मिळाली दुपारी चार वाजता दत्तशिखर मंदिर संस्थान तेथून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
विशेषतः गत दोन ते तीन वर्षा आधी नारळी पौर्णिमेपेक्षा दुपटीने यावर्षी भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली.
दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज, चिंतन महाराज, ऋषिकेश जोशी, रवी जोशी, तसेच दत्तशिखर येथील सर्व साधुसंत, संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी प्रथम पूजन करून यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
माहूरगड परिक्रमा यात्रा यशस्वी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा, वन विभाग, आरोग्य विभाग, व नगरपंचायत चे अधिकारी तथा कर्मचारी यांनी जीवापाड परिश्रम घेऊन कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये या करीता या वर्षी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) यात्रा वाढलेली भाविक संख्या पाहता परिश्रम घेऊन यात्रा यशस्वी करून दाखविली.