मनपाच्या वृक्षमित्र स्पर्धेत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा सहभाग

प्रतिनिधी पवन जाधव चंद्रपूर
चंद्रपूर : भावी पिढीला स्वच्छ व समृद्ध पर्यावरण मिळण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षमित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सहभाग घेतला असून तुकूम परिसरातील मिनगाव मारोती देवस्थान परिसरात सौंदर्यीकरण, साफसफाई व वृक्षारोपण केले जात आहे.
पर्यावरण सर्वंधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने मागील दीड दशकापेक्षा अधिक कालावधीपासून विविध प्रकल्प, उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत समाजात जनजागृतीसाठी सक्रीय सहभाग घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांच्या संकल्पेतून व प्रयत्नाने ही संस्था पर्यावरणासाठी कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे विविध रचनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहे. जनजागृती रॅली, सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे वेळोवेळी आयोजन करून जनजागृतीत योगदान दिले आहे. दरम्यान, मनपातर्फे आयोजित वृक्षमित्र स्पर्धेत सहभागी होत सौदर्यीकरण, वृक्षारोपण व साफसफाईचे काम तुकूम परिसरात केले जात आहे.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांच्या कुशल मार्गदर्शनात संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मागील एक महिन्यापासून रोज वृक्षारोपण करीत आहे. सोबतच, एक पेड माॅ के नाम, एक लडकी एक पेड, वृक्ष दत्तक, तुलसी उपवन, पंचवटी, चौकात वटवृक्ष व पिंपळ वृक्षाचे रोपण आणि विविध फळ आणि फुलांच्या रोपट्यांचे रोपणही या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. जनजागृतीच्या उद्देशाने संस्थेद्वारा रॅली व पथनाटयाचे आयोजन केले जात आहे. समाजमाध्यमातून जनजागृती अभियान राबविले जात असून परिसरातील नागरिकांचेही या उपक्रमात सक्रीय योगदान मिळत आहे.
बाॅक्स…
पर्यावरणाला महत्व देऊन नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि आपले कर्तव्य समजून वृक्षारोपण संर्वधनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांनी केले आहे.

