
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात होत असलेल्या हर घर तिरंगा हे अभियान राबविले जात असून दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले व तदनंतर सकाळी 11.30 वाजता
माहुर नगर पंचायत च्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यावेळी माहूर शहर चे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी,माहूरचे नवनिर्वाचित तहसीलदार अभिजीत जगताप, माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, तसेच पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी वर्ग, इत्यादी सर्वांची उपस्थितीत तिरंगा रॅली मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये पायदळ, मोटारसायकल, व सजवलेल्या वाहनांची शिस्तबद्ध रॅली. अग्रभागी वर देशभक्तीपर गाणी व भारत माता की जय या जयघोषाने माहूर नगरी दुमदुमली होती. ही तिरंगा रॅली शहरातून मिरवणूक मार्गे वसंतराव नाईक चौक, टी पॉईंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पासून संग्रहालय मार्गे पुन्हा नगरपंचायत येथे सांगता झाली.