पूरग्रस्तांसाठी जीवनदायी हातभार – ॲमेझॉन व डोनेटकार्डची सा

कार्यकारी संपादक निरंजन नलगे उमरखेड
इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार व ISO मानांकन प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड जि. यवतमाळ, ॲमेझॉन व डोनेटकार्ड च्या सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबाना पळशी येथे शेल्टर किट पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे व पळशी येथील पोलीस पाटील रमेश सदावर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आली आहे. यवतमाळ जिह्यातील उमरखेड तालुक्यात १५ ऑगस्ट २०२५ च्या रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. इसापूर धरण १००% पाणीसाठा क्षमतेने भरल्यामुळे पैनगंगा नदी पात्रात धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी काठावरील गावांना अतिशय गंभीर पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले. सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदीकाठावरील अनेक गावात धरणातील सोडलेले पाणी शिरले. पुरामुळे शेकडो कुटुंबांचे घरे, शेती, जनावरे व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंबे बेघर व संकटात सापडली आहेत. या कठीण, संघर्षमय प्रसंगी नेहेमी प्रमाणे “आपत्ती कितीही मोठी असो, जिव्हाळा संस्था सेवाभावाने नेहमीच उभी राहते; नागरिकांसाठी मदतीची ही अखंड शृंखला आजही अविरतपणे सुरू आहे.” आपत्तीसमयी लोकांसाठी दिलासा, आधार आणि साथ बनणे हीच जिव्हाळा संस्थेची खरी ताकद आहे; आणि तीच भूमिका संस्था आजही प्रभावीपणे निभावत आहे. जिव्हाळा संस्था आपत्तीग्रस्तांसोबत सावली सारखी उभी राहिली आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी आपत्तीग्रस्त क्षेत्रातील नागरिकांनसाठी सेवा व मदत आदी कार्य अविरतपणे केले जाते
जिव्हाळा संस्थेचे सर्व सदस्य यांनी पूरग्रस्त भागाची पहाणी करून संस्थेच्या भागीदार कंपनी ॲमेझॉन व डोनेटकार्ड यांना विनंती करून यवतमाळ जिल्ह्यात मदत मिळवली. जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी सांगितले कि, ॲमेझॉन व डोनेटकार्ड यांनी पूरग्रस्त कुटुंबासाठी शेल्टर कीट या मध्ये दोन ताडपत्री, पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी बकेट, मछरदानी, पेस्ट, ब्रश, कपड्याच्या साबण, अंघोळीच्या साबण, बॅग, दोरी, महिलांना सॅनिटरी पॅड इत्यादी साहित्य कीट मध्ये शेकडो कुटुंबाना वाटप करण्यात येत आहे. तसेच या सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत केल्याबदल ॲमेझॉन व डोनेटकार्ड यांचे संस्थेचे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी मनपूर्वक आभार मानले. ॲमेझॉन व डोनेटकार्ड मदती मुळे पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा मिळाला. यावेळी पोफळी पोलीस स्टेशन चे कर्मचारी, जि. प. पळशी मुख्याध्यापक नामदेव तासके,गजानन देशमुख, सदानंद गिरी, शारदा वानखेडे गावातील लाभार्थी महिला व पुरुष, जिव्हाळा संस्थेचे सर्व स्वयंसेवक श्रीकांत शहा, राजू सुनेवाड, विजय राठोड, सुमेध वाहुळे, सखाराम गायकवाड, रोहित अलमुलवार, ज्ञानेश्वर शिंदे, राजू मुलावकर, काशीबा बावणे आदी उपस्थित होते.

