
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

श्री चिंतामणी सुपर अबॅकस अकॅडमी, राळेगाव येथील विद्यार्थीनी कु.अनन्या निलेश उत्तरवार हिने अबॅकस लेव्हल 3 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे. राळेगाव च्या विद्यार्थीनी ने सुपर अबॅकस नॅशनल समर चॅम्पियनशिप २०२५ मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.ही स्पर्धा २७ जुलै २०२५ रोजी संभाजीनगर ला पार पडली. यामध्ये भारतभरातील अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अबॅकस स्पर्धेचे आयोजन नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन स्पीड चॅम्पियनशिप अंतर्गत करण्यात आले होते.
राळेगाव येथील श्री चिंतामणी सुपर अबॅकस अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी कु. अनन्या निलेश उत्तरवार हिने अबॅकस लेव्हल 3 मध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विध्यार्थी व पालकांनी या यशाचे श्रेय श्री चिंतामणी अबॅकस अकॅडमी च्या संचालिका सौं भाग्यश्री आशिष इंगोले यांना दिले.
सेंटरच्या सर्वउत्कृष्ट कामगिरी साठी श्री चिंतामणी अबॅकस अकॅडमीला बेस्ट सुपर अबॅकस अवार्ड प्राप्त झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. प्रविण वक्ते (मा. प्रकुलगुरू),
डॉ. शालिनी अंकुशे (प्राचार्या- होमिओपॅथी मेडिकल कॉलेज),
श्री. विनोद जैन (आय. टी. तज्ञ), श्री मनिष महाजण सर उपस्थित होते.