
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

राळेगाव :- दि.०८/०८/२०२५ शुक्रवार रोजी शिवसेना पदाधिकारी यांची आढावा बैठकीचे आयोजन संतकृपा मंगलम राळेगाव येथे करण्यात आले होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर धाने पाटील,आमदार तथा निरीक्षक यवतमाळ जिल्हा हरिहर लिंगणवार,संपर्क प्रमुख यवतमाळ जिल्हा श्री.गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख यवतमाळ इत्यादी मार्गदर्शक लाभले.यावेळी मंचावर शिवसेना तालुका प्रमुख श्री.मनोज भोयर,श्री.जानराव गिरी,नगरपंचायत उपाध्यक्ष राळेगाव इम्रानभाई पठाण,नगरसेविका सिमरण पठाण,नगरसेविका सौ.ज्योसना डंभारे,नगरसेवीका सौ. कवीता कुडमथे,नगरसेवीका सौ. राऊत ताई,नगरसेविका सौ.बोबडे ताई, कुंदाताई मिलमीले तालुका प्रमुख महीला आघाडी,सौ.संगिताताई आगे,ॲड.योगेश ठाकरे,श्री.दिपक येवले, चाॅदभाई कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख मनोज भोयर यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. दिवाकर जवादे तसेच समालोचन ॲड श्री.योगेश ठाकरे यांनी केले,सदर कार्यक्रमाला तालुक्यातील संपूर्ण शिवसेना पदाधिकारी,महीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.