
प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

कळब :-शेतकरी खरोखर संकटात आहे त्याच्या समस्यां अडचणी काळजीपूर्वक समजून घ्या, त्यांच्या करिता असलेल्या योजनांची त्यांना माहिती द्या शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्या असे आवाहन शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना केले.
ते कळब येथे आयोजित शिवसेनेच्या आढावा बैठकीत बोलत होते.
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावात द्या,शिवसेनेचा आत्मा हा शाखा आहे,
त्यामुळे शाखा वाढवा शाखेत शिवसैनिक वाढवा,
गावात लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या त्यांना मदत करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करा,
असे आवाहन त्यांनी केले. कळब येथे संपर्क कार्यालय झाले तेथून लोकांच्या समस्या सोडवा,
आज तुमच्या जवळ जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.ना.संजय भाऊ राठोड यांच्या सारखा नेता तुम्हाला मिळाला आहे,
या संधीचा उपयोग लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी करा असेही ते म्हणाले सुमारे अर्धा तास त्यांनी संघटनात्मक बांधणी वर मार्गदर्शन करून उपस्थित शाखा प्रमाण उपतालुका प्रमुख यांच्या कडून शाखांचा आढावा घेतला.व नगर पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आढावा घेतला
सुरवातीला कळब तालुका प्रमुख अभिषेक पांडे यांनी तालुक्यातील शाखांची माहिती दिली
व आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे सांगितले.
शिवसेना यवतमाळ जिल्हा समनव्यक हरिहर लिंगणवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त परिश्रम घेण्याची गरज व्यक्त केली, यांनी कळब तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश शिवसेनेला मिळेल अशी ग्वाही देत पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे,
असे म्हटले आहे.
शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे तो विचार आपल्या सोबत आहे.यावेळी शिवशेना जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाने (पाटील) जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर भाऊ लिंगनवार जिल्हाप्रमुख डोमाळे जिल्हाप्रमुख महिला आघाडी वैशाली मासाळ तालुकाप्रमुख अभि पांडे मनोज माईदे मेघा मांडवकर.सुषमा धनरे संगीता खोडे.शारदा थोटे. रतिलाल पवार.राजेंश मांडवकर. अतुल घोटेकर. प्रवीण जुनुनकर. जनार्धन रोकडे. प्रवीण बोटरे. भीमराव सोनाळे. सचिन जगताप. प्रथमेश दिघडे. मंगेश वरटी. अभिलाष नागोसे. शैलेश गोर. संदीप झोड. प्रशांत भिवणकर. आकाश धुर्वे. जगदीश राठोड. राहुल गुल्हाने. अक्षय धोटे. दादूसिंग आडे. होते.