राळेगाव प्रतिनिधी :- नरेश राऊत

राळेगांव : तालुक्यात बाप्पांच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला असून गावागावांत श्री गणेशाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विविध मंडळे व घरगुती गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत व पारंपरिक नृत्याच्या तालावर श्री गणेशाची स्थापना केली.
गावातील प्रमुख रस्त्यांवर सजावट, फुलांचे तोरण, रंगीबेरंगी लाइटिंग यामुळे परिसराला वेगळेच आकर्षक रूप लाभले आहे. “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या निमित्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून, काही मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत. तालुक्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

