
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेश प्रतिष्ठापित केले जाते. हा उत्सव साधारणपणे १० दिवसांचा असतो, त्या अनुषंगाने येत्या 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सणाला सुरुवात होत आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी बालाजी मंगलम येथे माहूर मधील व तालुक्यातील सर्वच गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रशासन तर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीत माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष नाना लाड, पोलीस निरीक्षक गणेश कराड, महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण चे अभियंता श्री शेंडे या मान्यवरांनी यावर्षीच्या होणाऱ्या गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकार बांधव, नगरपंचायत चे कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, अभियंता विशाल ढोरे, स्वानंद मामीलवाड, मझर शेख, विजय शिंदे, गणेश जाधव उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मिरवणूक मार्गातील अतिक्रमण हटविण्यात यावे असे गणेश भक्तांनी मागणी केली असता प्रशासनाने सहमती दर्शविली. उपस्थित प्रशासनातील अधिकारी यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या गणेश मंडळातील अध्यक्ष व पदाधिकारी यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गणेश मंडळासमोर विविध समाजोपयोगी, सांस्कृतिक, कार्यक्रम राबवा तसेच गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.