
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

दिनांक 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पंचशील विद्यालय लखमापूर येथील प्रांगणात श्री रेणुका देवी कबड्डी क्लब च्या वतीने युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि श्री रेणुकादेवी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी. यु. जाधव यांच्या हस्ते सर्व कबड्डी खेळाडूंना टी-शर्ट वितरण करण्यात आले. कबड्डी क्लब चे अध्यक्ष प्रेम चव्हाण माहूर तालुक्यात कबड्डीचे प्रशिक्षण देत असतात, त्यांचे खेळाडू तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय ते प्रो-कबड्डी पर्यंत खेळाडूंनी मझल मारलेली आहे. त्यामुळे प्रेम चव्हाण यांच्या कबड्डी समूहाला मैदान मिळावे अशी मागणी त्यांनी युवा ग्रामीण पत्रकार समूहाला व्यक्त करून दाखविले होते, तर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत अध्यक्ष प्रेम चव्हाण यांना लेखी आश्वासन दिले दरम्यान युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, समाधान कांबळे,आदेश बेहेरे, शंकर भालेराव, सदानंद पुरी, गोपाल चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.