ढाणकी प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे की,ढाणकी शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ढाणकी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ अर्चनाताई सुंदरकांता वासमवार व प्रभाग क्र.1 चे नगरसेवक परमेश्वर निमलवाड प्रभाग क्र.5 चे नगरसेवक उमेश योगेवार व प्रभाग क्र.6 चे नगरसेवक मुन्ना भाई यांनी आता कंबर कसली आहे स्वच्छ शहर सुंदर शहर हा केवळ नारा न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी नगरपंचायतने स्वच्छ मोहीम हाती घेतली आहे. शहरात सध्या युद्ध पातळीवर कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तिन्ही प्रभागाच्या परिसरात कचऱ्याचा ढीग साचले होते. याची दखल घेत नगराध्यक्षा व प्रभागाचे नगरसेवक यांनी मिळून दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ मोहीम राबवली आणि परिसर चकाचक केला.

