माहूर (प्रतिनिधी) अनिल माडपेलीवार

दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी शासकीय विश्रामगृह माहूर येथे आले असता समवेत नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश जी पावडे हे रेणुका मातेच्या दर्शनाकरिता आले होते. दरम्यान सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी विश्रामगृह येथे झाले तसेच नाना पटोले यांच्या भेटीसाठी विशेष करून शिवसेना उबाठा गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांनी भेट घेतली. दरम्यान होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर माहूर गडावर दर्शन करिता रवाना झाले.
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांशी महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी माहूर येथे आले असता. यावेळी श्री. रेणुका देवी मंदिर येथे आ.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते सह पत्नीक महाआरती व पूजाअर्चा करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा किनवट/ माहूर निरीक्षक बालाजी चव्हाण साहेब, काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते मार्केट कमिटीचे मा. सभापती मंचकराव देशमुख, मा. प.स. सदस्य किशनराव राठोड, वानोळा जि.प. सर्कलचे इच्छुक उमेदवार भावी जि. प.सदस्य कृष्णकुमार राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे, काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते माणिकराव पाटील, मा. उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, अखिल भारतीय किसान सेल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माधव पाटील पवळे, राम रेड्डी आईटवाड, जगदीश पाटील तुपदाळे, जयकुमार पाटील आडकीने, अनिल मडपेल्लीवार, अर्धापुर प्रभारी अध्यक्ष डॉ. उत्तमराव इंगळे,अर्धापुर काँग्रेस ता.उपाध्यक्ष बळीराम पाटील हटेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र डहाळे, राजु सौंदलकर, निसार कुरेशी, अजीम सैय्यद, जब्बार शेख, जब्बार भाई, संजय गायकवाड, शेख अली,सादिक शेख, जमीर खान, मन्नाण शेख, शरीफ शेख, ब्रम्हा हानवते इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

