
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर
वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीतील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या,अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जितू चोले यांनी दि.25 जुलै रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
माहूर तालुक्यात सह्यांद्री पर्वतावर विशाल असे जंगल आहे.या जंगलातील हरीण, काळविट,रानडुक्कर आदी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त असल्याचे वास्तव जितू चोले यांनी आपल्या निवेदनात मांडले आहे.निवेदनावर तालुका संघटक सुशील जाधव,माजी सभापती डॉ. नामदेव कातले आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
