माहूर (प्रतिनिधी) अनिल माडपेलीवार

नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारे जात पात न बघता प्रत्येक गोर गरीबाच्या मदतीला धावून जाणारे युवा नेतृत्व (युवा आघाडी तालुकाध्यक्ष माहूरगड) तथा धडाडीचे निर्भीड युवा पत्रकार आदेशभाऊ बेहेरे युवा ग्रामीण पत्रकार संघ, कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मूळ गावी मौजे नखेंगाव येथे नवीन उपक्रम हाती घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नखेगाव तसेच अंगणवाडी नखेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊन सेवा संकल्प करण्यात आला. व वाढदिवसाची आठवण म्हणून जि. प. प्रा. शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या.
आदेश बेहेरे यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये केक कापून साजरा करण्यात आला. तदनंतर अल्पोपहाराचे आयोजन देखील करण्यात आले.
यावेळी वाढदिवसाला विशेष उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गणेश कचकलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे, तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, उपाध्यक्ष समाधान कांबळे, सदस्य सदानंद पुरी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुरली नखेगाव गट ग्रामपंचायत च्या सरपंच कु. शालूनाताई परचाके, ग्रामसेवक पाईकराव साहेब, सदस्य प्रतिनिधी भीमराव गायकवाड, जि. प. प्राथमीक शाळा नखेगावचे मुख्याध्यापक जाधव सर आणि आदेश भाऊ मित्र मंडळ नखेगाव व इतर गावकरी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सय्यद इसा यांनी केले.

