तालुका कृषी अधिकारी ए.एम. यलपलवाड यांचे आवाहन
माहूर :(अनिल माडपेलीवार)
खरीप हंगामातील पेरणी घाईगडबडीत न करता पुरेसा पाऊस आणि जमिनीतील ओल पाहूनच पेरणी योग्य वेळी करावी, असे आवाहन माहूर तालुका कृषी अधिकारी ए.एम.यलपलवाड यांनी केले आहे.
यावेळी शेतकऱ्यांना माहिती देताना ए.एम.यलपलवाड म्हणाले की, पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.पेरणीसाठी जमिनीत किमान १०० मि. मी. पाऊस होणे आवश्यक आहे. याशिवाय पेरणी केल्यास उगवण नीट होत नाही व दुबार पेरणीचा धोका वाढतो, जमिनीतील ओल तपासावी. पेरणीपूर्वी जमिनीत वाफसा स्थिती असणे गरजेचे आहे.
केवळ वरचा थर ओला झाला
म्हणून पेरणी करून नये. बियाण्याची उगवणक्षमता तपासा. बाजारातून खरेदी केलेल्या तसेच घरगुती बियाण्याची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी. यामुळे नापिकी टाळता येईल. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याचे पालन करूनच पेरणीचे नियोजन करावे, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल व आर्थिक नुकसान टाळता येईल, असे आवाहन माहूर तालुका कृषी अधिकारी ए.एम. यलपलवाड
यांनी केले. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.एम. यलपलवाड यांनी केले आहे.

