प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याच्या वावराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्या दिसत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पाळीव जनावरांची शिकार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
संभाव्य मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वन्यजीव प्रेमी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
माहूर हे डोंगराळ आणि जंगलव्याप्त क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्या, वाघ यांचा वावर येथे नेहमीच असतो. मात्र सध्या बिबट्या गावाच्या जवळ येत असल्याने शेतकरी महिला लहान मुले यांच्यात भीती आहे.
रेस्क्यू टीमची मागणी
माहूर येथे अनुभवी रेस्क्यू टीम तातडीने तैनातकरावी
कॅमेरा ट्रॅप लावून
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे रात्री गस्त
वाढवावी
गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात
मानवी जीवितहानी होण्यापूर्वीच कारवाई करा अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
नागरिकांनी सतर्क रहा
बिबट्या दिसल्यास जवळ जाऊ नये गर्दी करू नये तातडीने वनविभागाला माहिती द्यावी
पाळीव जनावरे सुरक्षित ठेवावीत
लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये
रात्री शेतात जाणे टाळावे

