प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यातील गोंडवडसा अंजनखेड सेलू करंजी शेकापूर सिंदखेड पारडी आणि हारडफ या सात ग्रामपंचायतींच्या गेल्या पाच वर्षांच्या हिशोबाची चौकशी करावी अशी मागणी खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून हिशोब पारदर्शकपणे तपासला गेला नसल्याने निधीच्या वापराबाबत शंका निर्माण झाली आहे. ‘पायलट सेतू प्रकल्प’ अंतर्गत हिशोबात गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे संपूर्ण हिशोबाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

