
माहुर (अनिल माडपेलीवार)

समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर
युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका यांची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह माहूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गणेश जी कचकलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यामध्ये नवीन तीन सभासदांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये युनूस खान, कुंदन तीवडकर, महेश भाऊ ठाकरे ,यांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकारांच्या सामूहिक समस्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, पत्रकारावर होणारे खोटे गुन्हे यावर उपाय शोधणे पत्रकारांनी आपली पत्रकारिता करते वेळेस निर्भीड आणि निपक्षपातीपणे काम करणे सर्वांनी संघटित राहून संघटन कायम ठेवणे इत्यादी बाबीवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आले. बैठकीची प्रस्ताविक गणेशजी कचकलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल माडपेल्लीवार यांनी मानले या बैठकीत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते त्यामध्ये अनिल माडपेल्लीवार ,समाधान कांबळे ,आदेश बेहरे, सय्यद ईसा, राजूभाऊ दराडे ,सदानंद पुरी ,गोपाल नाईक ,शंकर भालेराव ,अंबादास मुकटे, गोपाल चव्हाण ,आदित्य खंदारे, युनूस खान, कुंदन तीवडकर, महेश भाऊ ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.