प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
टाकळी (ता. माहूर) आज जि.प. प्राथमिक शाळा टाकळी येथे अगोदर सहशिक्षक असलेले केंद्रे सर यांनी भेट दिली. त्यावेळी शाळेच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समिती कडून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रे सर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, अभ्यास, शिस्त व संस्कार याबद्दल मार्गदर्शन केले व चांगले शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
यावेळी पवार सर, विद्या मॅडम, रुद्रशील भवरे, किशोर अडकीने, निलेश कांदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या प्रगतीबद्दल केंद्रे सर यांनी समाधान व्यक्त केले.

