प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर श्री रेणुकामातेच्या माहूरगडावर नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. या भाविकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष फिरोज भैय्या दोसानी यांनी विशेष पुढाकार घेतला.
अष्टमीच्या पावन पर्वावर स्व. माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भाविकांना फराळ, केळी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात भाविकांना स्वच्छता, पाणी, वाहतूक यासाठी 24 तास नियंत्रण कक्षातून मदत दिली जात आहे. या कामात मुख्याधिकारी विवेक कांदे व कर्मचारी कार्यरत आहेत.
धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीची सेवा करणे हाच खरा मानवधर्म असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

