
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील शेतकरी परिवारातील एका विद्यार्थिनीने न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथील शाळेत दहावीला शिकत असताना दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्यातून 96.40%गुण पटकाविला त्या एका विद्यार्थिनीला प्रोत्साहन देण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आकांक्षा कोहाड हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सोबतच तीला एक नोटबुक , शिल्ड आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, डॉ. उगेमुगे,संचालक श्रावणसिंग वडते सर, अशोक काचोळे श्रीधर थुटुरकर,कवडूजी कांबळे, जितेंद्र कहूरके प्रविण झोटींग मनोज वर्मा, आगलावे महाराज, नगरसेवक मंगेश राऊत, नितीन कोमेरवार, राहुल बहाळे, संजय दुरबुडे, रमेश पेंदाम, विलास देशमुख, अरविंद खेडेकर, मनोज पेंदोर, दिलीप किन्नाके यांच्या सह व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर सचिन बोरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.