प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

कळंब तालुक्यातील परसोड बु येथील युवक तरुण प्रवीण हनुमान मेश्राम वय 29 वर्ष सोमवार दिनांक 25 रोजी विष घेतल्यामुळे त्याला वसंतराव नाईक शाशकीय रुग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले होते त्याला दवाखान्यातून 27 तारखेला सुट्टी देण्यात आली पुन्हा त्याची प्रकृती दिनांक 28 रोजी संध्याकाळी 6 वाजता अचानक बिघडली असता त्याला कळंबला ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले असता संध्याकाळी 8 वाजता निधन झाले घरातील कमवता व्यक्ती गेल्यामुळे घरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी व आई वडील आहे आत्महत्याच कारण अध्यप समजले नसून पुढील तपास कळंब पोलीस करीत आहे.

